'ड्रग रॅकेट' प्रकरण: आरोपींमध्ये ममता कुलकर्णी

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

ठाणे - अलिकडेच समोर आलेल्या मोठ्या "ड्रग रॅकेट‘ प्रकरणातील आरोपींच्या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णी हीचे नाव समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

ठाणे - अलिकडेच समोर आलेल्या मोठ्या "ड्रग रॅकेट‘ प्रकरणातील आरोपींच्या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णी हीचे नाव समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

ममताचे पती विकी गोस्वामी याचेही नाव आरोपींमध्ये यापूर्वी समाविष्ट आहे. भारतामध्ये तयार झालेले अंमली पदार्थ भारताबाहेर पाठविण्याच्या प्रकरणात विकीचा समावेश होता. "आमच्याकडे मिळालेल्या नव्या पुराव्यांमुळे आता ममता कुलकर्णी आरोपी आहे. तिचा पती विकी गोस्वामी यापूर्वीच आरोपी आहे‘, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. तसेच या दोघांना लवकरच "रेड कॉर्नर नोटिस‘ बजावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय या प्रकरणाशी बॉलिवूडमधील अन्य काही जणांचा समावेश आहे का याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सिंह म्हणाले. ठाणे पोलिसांनी एप्रिलमध्ये विविध प्रकारचे 18.6 टन ड्रग्ज्‌ सोलापूरमधील एका कारखान्यातून जप्त केले होते. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

Web Title: Mamta Kulkarni named accused in Thane drug racket case