विकृतीचा कळस! भटक्या कुत्रीवर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार

पूजा विचारे | Tuesday, 28 July 2020

ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

मुंबईः ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सध्या या विकृताची चौकशी पोलिस करत आहेत. त्यानं एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं दोन प्राणी मित्रांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील पादचारी पुलावर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा वागळे इस्टेटमधील रोड क्रमांक १६ हजुरी येथे राहतो. 

अधिक वाचाः  अरे वाह! मुंबईत स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, ठाकरे सरकारचा मोठा प्लान

शनिवारी सागर गुप्ता आणि त्याचे मित्र रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांना रोज खायला देतात. ठाणे येथील वागळे इस्टेटमधील जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळ स्कायवॉकवर आरोपी विजय महादेव चाळके हा कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी आरोपीला पकडून ठेवलं आणि 100 नंबरवर फोन केला. तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबंधित स्थानिक पोलिसांना दिले असल्याची प्राणीमित्रांनी दिली.

हेही वाचाः  आता इमारतीच्या बाहेर होणार तुमचं फुफ्फुसांचं स्कॅनिंग, पालिकेनं बसवली यंत्रणा

आम्हाला वाटलं की तो बेघर आहे म्हणून स्कायवॉकवर राहत असेल, असं गुप्ता म्हणाले.  पोलिसांनी सांगितलं की, आरोपी केंद्र सरकारच्या एजन्सीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा  मात्र आता तो सध्या बेरोजगार आहे.

Man arrested by thane police for doing obscene behaviour with dog at Wagale Estate

आईचे जावयासोबत तर मुलीचे दिरासोबत अनैतिक संबंध ! आईचा खून करणाऱ्या मुलीसह प्रियकर न्यायालयीन कोठडीत
घटनाक्रम...  पतीच्या निधनानंतर एकटी राहणाऱ्या सासूचे जुळले जावयासोबत अनैतिक संबंध आईने जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याने मुलीने ठेवले दिरासोबत संबंध दिरासोबतच्या अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या आईला मुलीसह मुलीच्या प्रियकराने संपविले तोरवी (विजयपूर, कर्नाटक) येथे राहायला होती मुलगी; रात्रीत खून करुन दोघेही झाले पसार मयताची नणंद कविता भोसले यांनी 8 नोव्हेंबरला दिली होती विजापूर नाका पोलिसांत फिर्याद लक्ष्मीबाई माने यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी दोन दिवसांत लावला प्रकरणाचा छडा संशयित आरोपी मुलगी अनिता महादेव जाधव व दिर शिवानंद भिमप्पा जाधव हे दोघेही आता न्यायालयीन कोठडीत अनैतिक संबंधातूनच मुलीने आईचा खून केल्याचे तपासात उघड; कोल्हाळ यांची माहिती