Crime : कपड्याने गळा आवळून मुलाने जन्मदात्या केली आईची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर... | man kills mother after heated argument | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime : कपड्याने गळा आवळून मुलाने जन्मदात्या केली आईची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर...

पालघर : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका मुलाने आईची हत्या केली. घटनेपूर्वी आई आणि मुलामध्ये जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद इतका वाढला की, मुलाने रागाच्या भरात आईचा कपड्याने गळा आवळून खून केला.

आई आणि मुलामध्ये कशावरून वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विरार येथील २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली धनू (वय ४४) या विरारमधील फुलपाडा परिसरातील गांधी नगर कॉलनीत आपल्या मुलासह राहत होत्या. काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात आई आणि मुलामध्ये कशावरून वाद झाला होता. गुरुवारी पुन्हा भांडण सुरू असताना रागाच्या भरात आरोपीने लांबलचक कापड घेऊन आईचा गळा आवळून खून केला.

काही वेळाने महिलेची आई त्यांच्या घरी पोहोचली असता ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली.

टॅग्स :Mumbai NewsCrime News