मंदा म्हात्रे यांची निवडणूक प्रचारात आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी निवडणुकीच्या प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. म्हात्रे यांच्या कार्यतत्परतेमुळे विविध समाजांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता वाढत आहे. यादरम्यान नवी मुंबईच्या नाभिक समाजानेही म्हात्रे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

नवी मुंबई : बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी निवडणुकीच्या प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. म्हात्रे यांच्या कार्यतत्परतेमुळे विविध समाजांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता वाढत आहे. यादरम्यान नवी मुंबईच्या नाभिक समाजानेही म्हात्रे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. रविवारी (ता. ६) नाभिक समाजातर्फे नाभिक विकास फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत विविध समाजांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे अनेक समाजातील होतकरू तरुणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नाभिक समाजानेही मांडलेल्या अनेक समस्या म्हात्रे यांनी सोडवल्या आहेत. समाजातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गासोबतचे हितसंबंध जपून त्यांनी काम केले आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या म्हात्रे या नवी मुंबईतील पहिल्या आमदार असल्याचे मत नाभिक विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेश गायकर यांनी व्यक्त केले. 

नाभिक समाजाचे प्रश्‍न सोडवले असल्याने आज आणि भविष्यात येणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगांत म्हात्रेंच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्‍वासन गायकर यांनी दिले. मंदा म्हात्रेंना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक महासंघ व नाभिक विकास फाऊंडेशन अविश्रांत मेहनत घेणार असल्याचा विश्‍वास गायकर यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नाभिक समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आमदार म्हणून आम्हाला मंदा म्हात्रे हव्या आहेत, असा निर्धार नाभिक समाजाने केला असल्याचे फाऊंडेशनचे पदाधिकारी जयेश पवार यांनी सांगितले. या वेळी नाभिक समाजाचे सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन म्हात्रे यांनी दिले. याप्रसंगी सुभाष गायकर, जगन्नाथ भोईर, समीर पवार, जयवंत गायकर, राजेश गायकर, विष्णू गायकर, लक्ष्मण गायकर, संगम पवार, जीवन गायकर, अजित गायकर उपस्थित होते.

आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी समाजातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गासोबतचे हितसंबंध जपून काम केले आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या म्हात्रे या नवी मुंबईतील पहिल्या आमदार आहेत. नाभिक समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आमदार म्हणून त्या आम्हाला हव्या आहेत.
- नरेश गायकर, अध्यक्ष, नाभिक विकास फाऊंडेशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manda Mhatre leads the election campaign