बेलपुरातून मंदा म्हात्रे विजयी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

बेलापुर मतदारसघातून भाजपाच्या मंदा म्हात्रे या निवडून आल्या आहेत. मंदा म्हात्रे यांना  ८७८५८ मतं मिळाली आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना ४४२६१ तर मनसे उमेदवार गजानन काळे २७६१८ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात मंदा म्हात्रे या ४३५९७ मतांनी विजयी झाल्यात.

बेलपुरात यंदा विधानसभेसाठी 44.50% मतदान झालंय. बेलापूर मतदारसंघाकरिता एक लाख 74 हजार 283 मतदानाची नोंद झाली. नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात 386 मतदान केंद्र, 20 टेबलांवर 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली.

मंदा म्हात्रे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे अशोक गावडे, मनसेतर्फे गजानन काळे या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे एकेरी होणारी निवडणूक तिरंगी झाली. त्यामुळे बेलापूर मतदारसंघात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही निवडणूक मंदा म्हात्रेंसाठी प्रतिष्ठेची होती. 

Webtitle : manda mhatre won from belapur vidhansabha constetuency

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manda mhatre won from belapur vidhansabha constetuency