मांडवा बंदरातील गाळ घोटाळा भोवणार

संग्रहित
संग्रहित

अलिबागः मांडवा ते भाऊचा धक्का यादरम्यान रो-रो वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या बंदरातून अद्याप एकही प्रवाशाने रो-रो बोटीतून प्रवासाचा आनंद लुटला नाही. असे असतानाही मांडवा बंदरातील गाळ काढण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्‍याचा आराेप होत आहे. याची सत्यस्थिती पडताळून संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचे बंदर विकासमंत्री तथा मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष अस्लम शेख यांनी सांगितले.

तत्कालीन सरकारने सागरमाला प्रकल्पांतर्गत मांडवा येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधली आहे. बारमाही जलप्रवास करता येईल असा दावा, मेरिटाईम बोर्डाने केला होता. जेट्टी बांधून दीड वर्ष पूर्ण झाले तरीही येथून रो-रो सेवा सुरू झालेली नाही. मान्सूनच्या लाटा परतवून लावण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रेकवॉटर बंधाऱ्याची रचना योग्य नसल्याने गाळ मोठ्या प्रमाणात बंदरात वाहत येत असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. 

जेट्टी आणि बंधाऱ्यासाठी एकूण १३५ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आलेला आहे. असे असतानाही त्याचा कोणताही उपयोग नागरिकांना करता आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे सूतोवात अस्लम शेख यांनी दिले आहेत.

गाळ काढण्याच्या कामाकरिता गाळ न काढता अंदाजे २० कोटी रुपये इतक्‍या खर्चाचा घोटाळा झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी उघड केले होते. याबाबत माजी आमदार मधुकर ठाकूर म्हणाले की, मे. रॉक अँड रिफड्रेझिंग प्रा. लि. या कंपनीने मांडवा येथील गाळ काढण्याच्या कामामध्ये मेरिटाईम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडील अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने या कंपनीला मेरिटाईम बोर्डाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com