"मधुरांगण'तर्फे बेलापूर येथे मंगळागौर स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

श्रावण महिन्यात हौसेने मंगळागौरीला रात्रभर खेळले जाणारे खेळ, फुगडीचा फेर आणि नृत्याचा ठेका या आठवणी पुन्हा जागवण्याची संधी ‘सकाळ मधुरांगण’ महिलांसाठी घेऊन आले आहे. ‘मधुरांगण’ व माधवबाग यांच्या वतीने शनिवारी (ता.१०) सायंकाळी ४.३० वा. सकाळ भवन सभागृह, दुसरा मजला, सेक्‍टर-११, प्लॉट नं. ४२ बी, बेलापूर या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.

मुंबई : श्रावण महिन्यात हौसेने मंगळागौरीला रात्रभर खेळले जाणारे खेळ, फुगडीचा फेर आणि नृत्याचा ठेका या आठवणी पुन्हा जागवण्याची संधी ‘सकाळ मधुरांगण’ महिलांसाठी घेऊन आले आहे. ‘मधुरांगण’ व माधवबाग यांच्या वतीने शनिवारी (ता.१०) सायंकाळी ४.३० वा. सकाळ भवन सभागृह, दुसरा मजला, सेक्‍टर-११, प्लॉट नं. ४२ बी, बेलापूर या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी आणि घर सांभाळण्याच्या कसरतीत अनेक महिलांना मंगळागौरीचा आनंद घेता येत नाही. रोजच्या रहाटगाड्यातून थोडीशी उसंत मिळावी, खेळामधून उत्साह टिकून राहावा, नवी उमेद व ऊर्जा निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणारे ‘सकाळ मधुरांगण’ त्यांना पुन्हा माहेरच्या विश्‍वात नेणार आहे. अनेक मंगळागौर ग्रुप या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 

मंगळागौर स्पर्धेसोबत माधवबाग मल्टिडिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्‍लिनिक्‍स ॲण्ड हॉस्पिटल्स्‌. डॉ. तेजस्विनी शिंगण, डॉ. सुवर्णा म्हात्रे या स्त्री-आरोग्य या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार असून, सदर कार्यक्रम सर्व मैत्रिणींकरिता विनामूल्य असून, या कार्यक्रमाचा आनंद आपल्या मैत्रिणी व कुटुंबासह घ्यावा. अधिक माहितीकरिता संपर्क ः ९८५०१३५०१३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Mangalagaur Contest" at Belapur by Madhuraganan