विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

माणगाव - विवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर मंगळवारी (ता. 21) माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माणगाव - विवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर मंगळवारी (ता. 21) माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रिया प्रवीण कळमकर (26, रा. रिळे पाचोळे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने 23 सप्टेंबरला कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. या महिलेच्या माहेर आणि सासरच्या नातेवाइकांची पोलिसांनी चौकशी केली होती. त्यामध्ये सासरचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पती प्रवीण प्रकाश कळमकर (वय 31), सासरे प्रकाश पांडुरंग कळमकर (55), सासू प्रमिला प्रकाश कळमकर (50) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: mangaon mumbai news women suicide