सिडकोकडून २८० हेक्‍टरवर खारफुटीची लागवड

सिडकोकडून २८० हेक्‍टरवर खारफुटीची लागवड
सिडकोकडून २८० हेक्‍टरवर खारफुटीची लागवड

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला परवानगी देताना संपादित जागेपेक्षा दुप्पट जागेत खारफुटीची लागवड करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण विभागाने सिडको प्रशासनाला दिली होती. त्यानुसार सिडकोकडून वन विभागाच्या मदतीने ४०० हेक्‍टरवर खारफुटीची लागवड करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील कामोठे, खान्देश्‍वर येथे २८० हेक्‍टर जागेत खारफुटीची लागवड पूर्ण झाली आहे. 

सिडकोने आपल्या अखत्यारीत असलेली खान्देश्‍वर रेल्वेस्थानक परिसरातील जागा खारफुटीच्या लागवडीसाठी आरक्षित ठेवली होती. गेल्या दोन वर्षांपासून वन विभागामार्फत खारफुटी लागवडीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कामोठे आणि खान्देश्‍वर येथे; तर दुसऱ्या टप्प्यात तरघर येथे खारफुटीची लागवड केली जाणार होती. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

सखल भागात खारफुटीची अधिक गरज
खान्देश्‍वर परिसरात खाडीलगत दाट खारफुटी आहे. त्याऐवजी खारघर आणि रोडपाली खाडीजवळील मोकळ्या जागेत खारफुटी लावणे गरजेचे होते. असे मत पर्यावरणप्रेमी, अभिव्यक्ती संस्थेचे प्रमुख नारेश्‍चंद्र सिंग यांनी व्यक्त केले.

सिडकोने वन विभागाच्या मदतीने खारफुटीची लागवड केली. अजूनही लागवडीचे काम सुरू असून, पहिला टप्पा पूर्ण झाला. एकूण ४०० हेक्‍टरवर लागवड करण्यात येणार आहे. 
- एन. वासुदेवन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, ठाणे.

खारफुटीच्या फळांच्या बी घेऊन पालघर येथील नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत. लागवडीसाठी निश्‍चित केलेल्या जागेवर वाफे तयार करून खारफुटीची रोपे लावण्यात आली आहेत. 
- प्रमोद पाटील, क्षेत्रीय अधिकारी, सिडको.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com