मुंबई - मार्वे रोड टी जंक्शनलगतच्या खाडीतील मंग्रोव्हसला आग

निसार अली
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई : मार्वे रोड टी जंक्शनलगत खाडी आहे. त्या खाडीतील मंग्रोव्हसला काही अज्ञात लोकांनी आग लावल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 6) घडली. दुपारी 1.30 ते 2 च्या दरम्यान उपरोक्त ठिकाणी मंग्रोव्हस जळत असल्याचं जागरूक नागरिक गोविंद मोहोने यांनी सांगितले. ते कामानिमित्त या रस्त्यावरून जात असताना त्यांना मंग्रोव्हस पेटलेले दिसले.

ताबडतोड त्यांनी तिथून मालवणी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली तसेच मालवणी अग्निशमन दलाला ही कळवले काही वेळेत पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या व अग्निशमन दलाने आग विजवल्याने पर्यावरणाची मोठी हानी टळली. मात्र प्रश्न असा की कोणी ही आग लावली? त्यांचा काय उद्देश काय होता? पोलीस यांच्यावर कारवाई करणार की नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

तसेच या ठिकाणावर हाकेच्या अंतरावर आय.एन.एस. हमला हे नवदलाचे केंद्र आहे. व या ठिकाणा नव दल सैनिक गस्त घालत असतात अशा ठिकाणी मंग्रोव्हस पेटवण्याचं धाडस कोणी बरं केले? यांना शोधण्याची जवाबदारी पोलिसांची आहे. दरम्यान पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. वन विभाग, पर्यावरण विभाग, महानगरपालिका या कडे लक्ष देणार की नाही, करण अति महत्वाचे असे हे मंग्रोव्हस दिवसा ढवळ्या जाळली जात आहेत. मग प्रशासन काय करत आहे. असे नागरिक विचारत आहेत.

Web Title: Mangroves fire in the Marave Road T junctional bay