'व्हॅलेंटाइन डे'निमित्त गो ग्रीन वसुंधरा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मानखुर्द - 'गो ग्रीन वसुंधरा' या पर्यावरणप्रेमी संस्थेने "व्हॅलेंटाइन डे'निमित्त अनोखा उपक्रम सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण किंवा रोप भेट देण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील निंभोरा गावात 25 हजार झाडे लावण्याचे संस्थेचे लक्ष्य असल्याचे संस्थेचे सदस्य समीर प्रभू यांनी सांगितले. व्हॅलेंटाइन डेनिमित्त अनावश्‍यक खर्च टाळून या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी @gogreenvasundhara या फेसबुक पेजला किंवा https://www.grow-trees.com/grove/view.php?g=ODcw&grove=go-green-vasundhara या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
Web Title: mankhurd news mumbai news go green vasundhara