कामांना गती देत उपन्नवाढीसाठी प्रयन्त करणार : मनोज चौधरी

kdmt
kdmt

कल्याण : केडीएमटीच्या डेपोचे सुसज्ज करण्याचे काम रखडलेले असून त्याला गती देण्यासोबत उपन्न वाढीसाठी प्रशासन आणि परिवहन समिती सदस्य यांना सोबत घेऊन काम करणार अशी माहिती नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय मध्ये आज बुधवार ता 12 जून रोजी परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली . निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काम पाहिले तर त्यांना मदत पालिका सचिव संजय जाधव यांनी केली . सभापती पदाचा निवडणूक मध्ये शिवसेना परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी यांचा एकमेंव अर्ज दाखल होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर करताच चौधरी यांना शुभेच्छा महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, व्यवस्थापक मारुती खोडके, परिवहन समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, परिवहन उपक्रम मधील अधिकारी आणि कर्मचारी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या तद्नंतर नवनिर्वाचित सभापती मनोज चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, रखडलेल्या केडीएमटी डेपोच्या कामाला गती, उपन्न वाढी साठी सर्वाना एकत्र घेऊन काम करेल, 71 कर्मचारी वर्गाचा विषय मंत्रालय मध्ये अडकला असून त्याला पाठपुरावा करत काम पूर्ण करेल, वाशी, भिवंडी, पनवेल हे उपन्न वाढीचे मार्ग असून तेथे आणखी बसेस वाढविण्याचा मानस असून कल्याण डोंबिवली मध्ये ज्या मार्गावर उपन्न आहे तेथे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना सोबत घेऊन समस्या दूर केली जाईल असे मत यावेळी सभापती मनोज चौधरी यांनी व्यक्त केले. 

परिवहन उपक्रम सन 99 मध्ये सुरू झाली असली तरी परिवहन समिती सन 1997 मध्ये अस्तित्वात आली. पहिले सभापती म्हणून म. गौ. हरदास यांनी 10 मार्च 1997 ते 9 मार्च 1998 या कालावधीत कारभार स्विकारला होता. सध्या परिवहन समिती मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून युतीच्या करारनुसार यावेळी शिवसेनेला सभापती मिळाले असून सभापती पदाची माळ मनोज चौधरी यांच्या गळ्यात पडली असून ते चौधरी हे 22 वे सभापती असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com