मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एकीचा मृत्यू! Mantralay News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mantralay

Mantralay News: मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एकीचा मृत्यू!

मुंबई : मुंबईत मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जेजे रुग्णालयात उपचारांदरम्यान या महिलेने आपले प्राण गमावले. वारंवार खेटे घातल्यानंतरही न्याय मिळत नसल्यानं त्यांनी काल दुपारी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.(Mantralay News One of two women who attempted suicide died at Mumbai)

शीतल गादेकर (रा. धुळे) यांचा जेजे रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईच्या नवी मुंबईच्या संगीता डवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भूखंडासाठीचा लढा अयशस्वी ठरल्यानं या दोघींनी मंत्रालयाबाहेर काल विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

काय आहेत घटना?

काल दुपारी सव्वा एकच्या दरम्यान मंत्रालयाच्या मुख्य दरवाजावर दोन महिला पोहोचल्या अन् त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणांहून आल्या होत्या. यांपैकी शीत गादेकर या धुळ्याहून तर संगीता डवरे ही महिला नवी मुंबईतून आली होती. एमआयडीसीमधील जागेबाबत फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेनं केला होता. यासाठी न्याय मिळावा म्हणून तीनं वारंवार मंत्रालयात खेटे घातले होते. पण अद्यापही आपल्याला न्याय मिळाला नसल्याचं सांगत त्यांनी टोकाचं पाऊल उचलत विष प्राशन केलं.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तर नवी मुंबईहून आलेल्या संगीता डवरे यांच्या पतीच्या आजारपणात रुग्णालयाचा जो खर्च आला होता, त्यामध्ये मोठी तफावत असून यातून आमची फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेनं केला होता. याबाबत वारंवार पोलिसांना माहिती देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळं या महिलेनं मंत्रालयात दाखल होत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर देखील जेजे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.