मंत्रालयातील अधिकाऱ्यांची मॅरेथॉनमध्ये धाव

Mantralaya-Mumbai
Mantralaya-Mumbai

मुंबई - मुंबईत रविवारी (ता.20) मंत्रालयातील सुमारे 35 च्या आसपास अधिकारी-कर्मचारीवर्ग मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे जवळजवळ सहा- सात अधिकारी 42 किलोमीटरची मीची दौड करणार आहेत तर उर्वरित 24 कि.मी व दहा कि.मी.चे टप्पे पूर्ण करणार आहेत.

उद्योग विभागात उपसचिव असलेले संजय इंगळे 42 किलोमीटर धावणार आहेत. उपसचिव डॉ. नामदेव भोसले हे "आनंदाने जगा, जगु द्या' आणि " तंदुरस्ती, उत्तम आरोग्य'" नो हॉर्न प्लिज' हा संदेश देण्यासाठी धावणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेले गोपीनाथ कांबळे, मुळचे नगरचे असलेले उपसचिव राहुल कुलकर्णी व त्यांच्या पत्नी उपसचिव गीता कुलकर्णी या देखील सहभागी होणार आहेत. कक्षाधिकारी मेघना शिंदे स्पर्धेत 21 किमी धावणार आहेत. अधिकाऱ्यांच्या जोडीने मंत्रालयातील प्रधान सचिव, सचिव दर्जाचे काही आयएएस अधिकारी देखील धावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com