गोड्या पाण्यात मुबलक मासोळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पावसाने उघडीप दिल्याने तालुक्‍यातील ओहोळ, नद्या आणि डबक्‍यातील मासेमारीला सुरुवात झाली आहे.

माणगाव (बातमीदार) : पावसाने उघडीप दिल्याने तालुक्‍यातील ओहोळ, नद्या आणि डबक्‍यातील मासेमारीला सुरुवात झाली आहे. मुऱ्या, डाकू आणि मळे मासे मुबलक प्रमाणत मिळत असल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे.

यंदा श्रावण, भाद्रपद महिन्यात मिळणाऱ्या मुऱ्या व इतर चविष्ट माशांनी पुरती निराशा केली होती. आदिवासी ओहोळांना बांध घालून पारंपरिक पद्धतीने मासे पकडतात. सध्या मुबलक मिळणाऱ्या गोड्या पाण्यातील मासे खवय्यांसाठी पर्वणी ठरत आहेत. २०० ते ३०० रुपये किलो मिळणारी ही मासळी खवय्यांची पसंती ठरत आहे. गेले तीन महिने पावसामुळे मासे मिळत नव्हते. बांधण असूनही काही उपयोग नव्हता. आता पाऊस कमी झाल्याने चांगले मासे मिळत आहेत. 

गोड्या पाण्यातील मासे चविष्ट असतात; त्यामुळे चांगली मागणी असल्याचे विक्रेते चंदर पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Fish in sweet water