खोपोलीत रस्त्यांची चाळण; वाहनचालकांचे हाल 

अनिल पाटील
Monday, 10 August 2020

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आधीच दुरवस्था झालेल्या खोपोली शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नगरपालिकेकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अजूनही नगरपालिकेने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

खोपोली ः मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आधीच दुरवस्था झालेल्या खोपोली शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नगरपालिकेकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अजूनही नगरपालिकेने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

मोठी बातमी - मुंबईकरांसाठी तब्बल सात तास मॅनहोलपाशी दिला खडा पहारा, स्वतःच घर मात्र पावसात गेलं वाहून
खोपोली शहरातील बाजारपेठ, समाजमंदिर रोड, शास्त्रीनगर, काटरंग, मोगलवाडी, भानवज, लक्ष्मीनगर रोड, विहिरी, वासरंग, चिंचवली, ताकई या प्रमुख डीपी रस्त्यांसहित सर्व अंतर्गत रस्ते, उपरस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणपतीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील, असे नगरपालिकेकडून सांगितले जात आहे; मात्र कोणत्याही प्रभागात खड्डे भरण्याची मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. खोपोली ही श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जाते. शंभर कोटीहून अधिक वार्षिक बजेट आहे. यात रस्त्यांसाठी वार्षिक 32 कोटींचे बजेट असताना येथील रस्त्यांची स्थिती मात्र भयावह बनली आहे. 

मोठी बातमी -  तब्बल एक हजार कोटींचा अवैध माल; नाव्हा शेव्हाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, कसं डोकं वापरलेलं वाचा

कोरोनाचे संकट आल्याने मार्च ते जून या काळात अपेक्षित रस्त्यांची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे भरण्याचे काम सतत सुरू आहे. 
- सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली नगरपालिका 

खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून चालताना मोठी कसरत करावी लागते. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे अपघात होत आहेत. पालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची आवश्‍यकता आहे. 
- गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली 

 

many potholes in khopoli road 

( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many potholes khopoli road