कल्याण : तिसगावमध्ये गणपती विसर्जन होणार की नाही? 

रविंद्र खरात
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कल्याण : गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान कल्याणच्या पूर्व भागातील तिसगांवमधील एका तलावामध्ये पोलिस कर्मचाऱ्याला बुडविण्याच्या प्रयत्नांचे पडसाद यंदाच्या गणेशोत्सवात उमटण्याची दाट शक्‍यता आहे. यामध्ये 'जरीमरी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची बदनामी करण्याचा कट रचण्यात आला होता' असा आरोप झाला होता. त्यामुळे यंदा या तलावात गणपती विसर्जन होणार नसल्याची चर्चा रंगली आहे. 

गेल्या वर्षी 6 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले, तेव्हा एका पोलिस कर्मचाऱ्याला काही युवक बुडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. या तलावामध्ये गेल्या 15-20 वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते. या सोहळ्यासाठी हजारो नागरिक येत असतात. गेल्या वर्षीच्या घटनेमुळे यंदा या तलावात विसर्जन होणार की नाही, यासंदर्भात उद्या (गुरुवार) ग्रामस्थ आणि जरीमरी सेवा मंडळाची बैठक होणार आहे. 

"गेल्या वर्षी घडलेली घटना दुर्दैवी होती. पण ती चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली. यामुळे गेल्या अनेक वर्षांचा सेवाभाव पाण्यात गेला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर न बोलणे उचित ठरेल. तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू होणार असल्याने यंदा या वर्षी गणपती विसर्जन होणार नाही. याबाबत येत्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल', अशी प्रतिक्रिया 'जरीमरी सेवा मंडळा'चे सचिव नाना सूर्यवंशी 'सकाळ'ला दिली.

Web Title: marahti news marathi website Kalyan Ganeshotsav