मराठा क्रांती मोर्चाची बैठक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - राज्यात मराठा क्रांती मोर्चाने शांततेत 58 आदर्श मूक मोर्चे काढले. मात्र सरकारने फसव्या घोषणा व फसवे आदेश काढून मराठा समाजाची फसगत केल्याचा आरोप करत सरकारविरोधात पुढची रणनीती आखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बैठक बोलावली आहे.

ही बैठक 28 एप्रिलला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी दहा वाजता होणार आहे. यामध्ये सरकारच्या फसव्या आदेशांची होळी करणे व शांततेच्या मार्गाने काढलेला मूक मोर्चा संपवून पुढची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे. या पत्रकावर आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, माणिकराव शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: maratha kranti morcha meeting