मुंबईत मराठा समाजाची बाईक रॅली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

मुंबई - मराठा मूक मोर्चे राज्यभरात जिल्हास्तरावर निघत असून जनजागृती करण्यासाठी मुंबईत आज (रविवारी) मोटरसायकल फेरी काढण्यात आली. शीव येथील सोमय्या मैदानातून सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या फेरीत शेकडो मोटारसायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) येथे फेरीचा अखेर झाला.

सोमय्या मैदान, चुनाभट्टी शेजारील एव्हरार्डनगर रोड, शीव सर्कल, टिळक रुग्णालय, माहेश्‍वरी उद्यान, खोदादाद सर्कल, दादर अग्निशमन केंद्र, हिंदमाता, पालिकेचे एफ-दक्षिण कार्यालय, परळ, भारतमाता, लालबाग, जयहिंद टॉकीज, राणीचा बाग, भायखळा ब्रिज, अब्दुल हमीद अन्सारी चौक, नागपाडा सिग्नल, जे. जे. उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज मंडई आणि शिवाजी महाराज टर्मिनस असा या फेरीचा मार्ग होता. भगवे झेंडे हातात घेत आणि भगवे फेटे परिधान केलेले मोटारसायकल स्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या फेरीमध्ये महिला व तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. 

प्रत्येक मोटरसायकलस्वाराने हेल्मेट घालणे बंधनकारक होते. मागे बसणाऱ्याने शक्‍यतो भगवा फेटा किंवा टोपी घालून पाण्याची बाटली बाळगावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पायलट कारने राखलेली गतीच सर्व मोटरसायकलस्वार राखत होते. कुणीही हॉर्न वाजवू नये, अथवा कोणतीही घोषणा देऊ नये, असे आवाहन संयोजकांनी केले होते. त्यानुसार शिस्त फेरीत दिसून आली.

Web Title: Maratha Kranti morcha: Mumbai bike rally on aims to press for reservation demands

व्हिडीओ गॅलरी