मराठा मुस्लिम समाजाच्या दाव्याने न्यायालयही आवाक! 

मराठा मुस्लिम समाजाच्या दाव्याने न्यायालयही आवाक! 

मुंबई - शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम मावळ्यांचाही समावेश होता. मराठा समाजातही मुस्लिम मराठा हा घटक आहे. मुस्लिम मराठ्यांना मराठा आरक्षणातून राज्य सरकारने वगळले आहे, असा दावा मंगळवारी मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच मराठा समाज हा नेहमीच मागास होता; मात्र त्याची शासकीय दखल घेण्यात आली नाही, असेही आज सांगण्यात आले. 

समाजामध्ये मुस्लिम मराठा असाही एक गट आहे. मुस्लिम धर्मीयांमध्ये या गटाने स्वतःला सामावून घेतले असले तरी त्यांची जात ही मराठा आहे; मात्र मुस्लिम मराठा या समाजाला मराठा आरक्षणामध्ये सामावून घेण्यात आलेले नाही, असा दावा ऍड. एजाज नक्वी यांनी केला. न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने मात्र दाव्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. मुस्लिम मराठासाठी आरक्षण द्या, अशी मागणी करणारी याचिका दुधनाथ सरोज आणि अमीन इद्रीसी यांनी केली आहे. मराठा असलेल्या या समाजवर्गाला विविध कारणांमुळे मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला; मात्र कागदोपत्री त्यांची मराठा जात कायम आहे, असेही नक्वींनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ओबीसींमध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू होऊ शकते. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यापेक्षा संबंधित 16 टक्के आरक्षण 34 टक्के आरक्षणामध्येच दिले जाऊ शकते, त्यामुळे कायद्यामध्ये आरक्षण बसू शकते, असा दावा याचिकादार राजेश टेकाळे यांच्या वतीने ऍड. प्रमोद पाटील यांनी केला. यासंबंधित 1994 च्या शासकीय निर्णयाचा दाखलाही या वेळी देण्यात आला. तसेच मराठा समाज नेहमीच मागास होता, याबाबत 1952 च्या जनगणनेच्या अहवालातही नमूद करण्यात आलेले आहे; मात्र त्याला आरक्षणापासून डावलले गेले, असा युक्तिवाद त्यांनी केला. राज्य सरकारने मुस्लिम आणि मराठा समाजाला एकाच वेळेस आरक्षण दिले; मात्र मुस्लिम आरक्षणाबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे मुस्लिम समाजाला याचा फटका बसला. राज्य सरकारने जाणीवपूर्वक असंविधानिकपणे मराठा समाजाला आरक्षण दिले, असा युक्तिवाद ऍड. सतीश तळेकर यांनी रझा अकादमीसह अन्य मुस्लिम संघटनांच्या वतीने केला. 

आरक्षणाच्या निर्णयाचे समर्थन करणारा राज्य सरकारचा युक्तिवाद बुधवारपासून न्यायालयात सुरू होण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठ विधीज्ज्ञ-माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी मुख्य युक्तिवाद करणार आहेत. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com