मराठा आरक्षणाची बाजू रोहतगी मांडणार

mukul-rohatgi
mukul-rohatgi

मुंबई - ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार असून, काल दोन फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे या प्रकरणी शासनाकडील सर्व माहिती जाणून घेतली.

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांना फेब्रुवारीत जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या सुनावण्या असून, त्यामुळे या कालावधीत ते इथे उपलब्ध नाहीत. मात्र या याचिकांवर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी बुधवार (ता. ६) पासून सुरू होणार असल्याने त्या वेळी शासनाची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी यांच्या बरोबर ॲड. विजय थोरात, ॲड. साखरे असे दिग्गज वकील या प्रकरणी संपूर्ण अभ्यास करून न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी या पूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना या प्रकरणी विनंती केली असून त्यांनी ती मान्य केली आहे. त्यानुसार त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले असून, त्यांच्या समवेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. परमजित सिंह पटवालिया आणि सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील ॲड. कटणेश्‍वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com