‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी सरकारी जमीन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेषत: मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी सरकारी जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे दिली. 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनावापर पडून असलेल्या इमारती, तसेच महसूल विभागाची पडीक जमीन वसतिगृहासाठी देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजातील गरीब मुलांना शहरी भागात शिक्षण घेता यावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, वसतिगृहासाठी जागा मिळत नसल्याने निर्णयाच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती विनावापर पडून आहेत, अशा इमारती वसतिगृहांसाठी प्रधान्याने दिल्या जाणार आहेत.दुर्लक्षित इमारतींच्या दुरुस्तीसाठी, तसेच रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अण्णा भाऊ साठे स्मारकाचा आराखडा लवकरच - कांबळे
मुंबई - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यांत सरकारला प्राप्त होईल. त्यानुसार नियोजित खर्चाचा अंदाज घेऊन या स्मारकाच्या उभारणीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी दिली. 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी मंत्रालयात झाली. चिरागनगर येथे प्रस्तावित जागेवर ७०० घरे आहेत. या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी काही विकसकांनी प्रस्ताव दिले आहेत. त्या विकसकांसोबत २३ मे रोजी बैठक होणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.  

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात डिजिटल लायब्ररी, अभ्यास केंद्र, शाहिरी कला शिकवणारे केंद्र, सभागृह, अण्णा भाऊंच्या विचारांचा प्रचार-प्रसार, त्यांचे समग्र साहित्य आदी ठेवले जाणार आहे. या स्मारकासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, दोन महिन्यांत आराखडा दिला जाईल, असेही कांबळे यांनी सांगितले.

Web Title: maratha society student hostel government land