#MarathaKrantiMorcha मराठा समाजाचे ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

ठाणे - मराठा समाजाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन शनिवारीही सुरूच होते. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, परंतु सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्‍वास नाही.

जोपर्यंत परळीत येऊन सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत ठाण्यातही आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका मराठा समाजाने स्पष्ट केली.
आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्‍वासन द्यावे, यासाठी मराठा समाजाने परळीत ठोक आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरत असून त्यांना समर्थन देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनकर्त्यांशी चर्चा
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले; मात्र त्‍यांचा प्रयत्‍न अयशस्‍वी ठरला.

Web Title: #MarathaKrantiMorcha agitation maratha reservation