#MarathaKrantiMorcha राणे - मुख्यमंत्री चर्चा  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई -  मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये असताना आरक्षणाच्या बाबतीत अहवाल दिला होता. त्यांच्याच अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींवर तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. राणे यांच्या या अनुभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. 

दरम्यान, राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर तातडीने निर्णय व्हावा. मराठा समाजाच्या विविध सामाजिक योजनांबाबत सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्याची कटाक्षाने अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. 

Web Title: #MarathaKrantiMorcha Narayan Rane & Chief Minister discussion