अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज (ता.04) निधन झालं. वयाच्या 70 व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं आहे.

'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भाटकर यांच्या घरी 03 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम होता.

हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, कमांडर, बंदिनी अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. मालिकांशिवाय माहेरची साडी, माझं सौभाग्य, अष्टविनायक, आपली माणसं, गृहलक्ष्मी अशा सिनेमांमध्ये काम केलं. नाटकांमध्येही त्यांची कारकीर्द मोठीच राहिली. अश्रूंची झाली फुले, मुक्ता, उघडले स्वर्गाचे दार, देणाऱ्याचे हात हजार अशा 50 हून अधिक गाजलेल्या नाटकांमध्येही त्यांनी काम केलं होतं.

रमेश भाटकर यांचे रंगभूमी हेच त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'अश्रूंची झाली फूले' हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. 1977 ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com