'विजय चव्हाण आजारी असताना किती कलाकार भेटले?'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबईः ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण (वय 63) यांचे आज (शुक्रवार) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जागवताना श्रद्धांजली वाहिली. पण, विजय चव्हाण आजारी असताना किती कलाकार भेटायला गेले? असा प्रश्न दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी फेसबुकवर उपस्थित केला आहे.

विजय चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींचे अनेक मेसेज सोशल मिडीयावर व्यक्त होऊ लागले आहेत. अनेकजण शोक व्यक्त करताना विजू मामा यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाली आहे, असे म्हणतात. परंतु, यावरच संताप व्यक्त करत विजय चव्हाण आजारी असताना त्यांना किती कलाकार भेटले? असा प्रश्न दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी उपस्थित केला आहे.

‘रंगभूमीवरील प्रत्येक व्यक्ती तुमचा मामा किंवा मावशी कशी होते आणि आणि दर आठवड्याला कोणा मामा किंवा मावशीचे निधन होत असल्यास रंगभूमी पोरकी कशी काय होते? जेंव्हा विजू मामा रुग्णालयात होते, तेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात का? आता उमेश कामत तुमचे मामा आणि स्पृहा जोशी तुमची आत्या होणार का? सई ताम्हणकर ही तुमची मावशी होणार का? पुन्हा यानंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी होणार का? ही कशाप्रकारची मूल्ये आहेत. रंगभूमी पोरकी झाली, हे किती तथ्यहिन आणि रटाळ वाक्य आहे,’ या शब्दांत कुंडलकर यांनी विचारले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर शोक कसा व्यक्त करतात हे तरी निदान शिकून घ्या, असेही त्यांनी या फेसबुक पोस्टअखेर म्हटले आहे. विजय चव्हाण हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. त्यावेळी कोणी त्यांची भेट घेतली का, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुंडलकर यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर अनेकांनी लाईक करून प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

Web Title: marathi actor vijay chavan passes away and director Sachin Kundalkar facebook post