पर्ण पेठे बनली रॅपर ? पर्णने मराठी, हिंदी, पारसी, गुजराती भाषेत केलं रॅप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

मराठी अभिनेत्रींना असं रॅप करताना आपण क्वचितच पाहिलय. मात्र पर्ण पेठेच्या रॅपने जबरदस्त राडा केला आहे.

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अभिनेत्री पर्ण पेठे सध्या तिच्या एका हटके कामामुळे चर्चेत आली आहे. पर्ण पेठेच्या मराठी रॅपविषयी बोललं जातयं.  मराठी अभिनेत्रींना असं रॅप करताना आपण क्वचितच पाहिलय. मात्र पर्ण पेठेच्या रॅपने जबरदस्त राडा केला आहे.

 

आता तुम्हाला वाटेल पर्णने हे रॅप एखाद्या चित्रपटासाठी वैगेरे गायलं असावं, पण तसं नाही. तर पर्णने नुकतच पृथ्वी महोत्सवात एक नाटक सादर केलय. 'Bone of contention in Cosmopolitan CHS' या नाटकात पर्णची एक हटके भूमिका आहे. पर्ण या नाटकात महाराष्ट्रीयन मोलकरणीच्या भूमिकेत दिसत आहे. या नाटकात पर्ण निवेदक आहे.

अशी निवेदक जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाट्यरसिकांचं लक्ष वेधून घेते.
या नाटकात पर्णने तब्बल 14 रॅप गायले आहेत. यात पारसी, हिंदी, मराठी, गुजराती अशा भाषांमधील रॅपचा समावेश आहे. या नाटकात विविध ठिकाणच्या कलाकारांची धमाल भट्टी जमली आहे. मुंबई, लखनऊ, दिल्ली, पुणे, उत्तराखंड, देहरादून आणि देशाच्या विविध कोपऱ्यातून आलेले जबरदस्त उर्जा असलेले कलाकार या नाटकात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress parna pethe become rapper