VIDEO : लंडनमध्ये नाताळात गायली मराठी 'कॅरोल्स'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

  • लंडनमधील पॅडिंग्टन स्टेशन ठरलं अनोख्या कार्यक्रमाचं साक्षीदार 
  • 50 पेक्षा अधिकांनी घेतला कार्यक्रमात सहभाग 

ख्रिसमस जवळ आलाय. अनेक ठिकाणी ख्रिसमस निमित्त कॅरोल्स गायले जातात. लंडनमधील नेहमीच  गजबजलेल्या ट्रेन स्टेशनवर देखील असेच कॅरोल्स गायले गेलेत. आता तुम्ही म्हणाल नाताळचा सण आहे, कॅरोल्स गाणार नाहीत तर काय भजनं गाणार का? पण तुम्हाला जर आम्ही सागितलं ही कॅरोल्स मराठीत गायली आहेत तर ? एका झटक्यात छान वाटलं ना ?   

धक्कादायक :  फ्लॅट दाखवण्याच्या नावाने अमृता घेऊन जायची आणि..

प्रशांत आणि माधुरी कुलकर्णी यांनी सेन्ट्रल लंडन मधील पॅडिंग्टन स्टेशनवर या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यामध्ये लंडन त्याचबरोबर इंग्लंड मधील अनेकांनी एकत्रित येत हे कॅरोल्स गायलेत. या दाम्पत्याच्या दोन मुलांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि कॅरोल्स गायलेत. या मंडळाचं नाव आहे मराठी ख्रिस्ती मंडळ UK.     

Image may contain: 8 people, people smiling

Image may contain: 7 people, people standing and outdoor

 

माधुरी यांनी पॅडिंग्टन स्टेशनवर सालव्हेशन आर्मीचा लाइव्ह कार्यक्रम पहिला होता. हा कार्यक्रम पाहूनच असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे, असं या दाम्पत्याला वाटलं. "तेव्हापासून आपल्याला समाजासाठी काहीतरी अनोखं करायला हवं असं त्यांच्या मनात आलं".     

धक्कादायक :  ...म्हणून त्या महिलेला कपडे बदलताना बाहेर काढले 

कुलकर्णी दाम्पत्य ग्रेट वेस्टर्न रेल्वेमध्ये काम करतात. कुलकर्णी यांनी नेटवर्क रेल्वेला याबाबत प्रस्ताव दिला, त्यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर पॅडिंग्टन स्टेशनवर हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. नेटवर्क रेल्वेकडून सर्व गायकांना फ्री ट्रेन तिकीटं देखील देण्यात आली.  

कुलकर्णी दाम्पत्याचा जन्म मुंबईत झालाय. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव राहतात. अशात भारतात ज्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने कॅरोल्स गायले जातात हे दाखवण्याची सुवर्णसंधी मिळाल्याचं कुलकर्णी दाम्पत्याने सांगितलं.

Image may contain: 18 people, people smiling, crowd and outdoor

 

Image may contain: 14 people, people smiling, people standing and outdoor

महत्त्वाची बातमी :  महाराष्ट्रातील बळीराजाला 21,216 कोटीची कर्जमाफी

कुलकर्णी दाम्पत्य तब्बल दहा वर्षांपासून परेदेशात वास्तव्यास आहेत. अनेकदा ख्रिसमस सणाला भारतात येणं शक्य होतं नाही. त्यामुळे भारतात ज्या पद्धतीने नाताळ साजरा केला जातो तसा नाताळ UK मध्ये साजरा करण्याचं डोक्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.    

परदेशात राहूनही कुलकर्णी यांचे UKमध्ये मोठा मित्रपरिवार आहे. दरवर्षी ख्रिसमसमध्ये कुलकर्णी दाम्पत्य त्यांच्या घरी रोस्ट टर्की आणि डिनर सोबतच   कॅरोल्स गातात आणि प्रार्थना देखील करतात. दरवर्षी कुलकर्णी यांच्या ख्रिसमस पार्टीला त्यांचे हिंदू आणि मुस्लीम मित्र हजेरी लावत असतात असं प्रशांत यांनी सांगितलं. 

मोठी बातमी : महाविकास आघाडीने 'शिवभोजन थाळी' बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय 

नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात लहान मोठ्या पन्नास पेक्षा अधिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये फक्त लंडनच नव्हे तर मॅनचेस्टर, बर्मिंगहम, ब्रिस्टॅाल या वेगवेगळ्या शहरातून देखील अनेकांनी हजेरी लावली होती.  अनेकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्थिक मदत देखील केली. 

WebTitle : Marathi christmas corols on paddington train station 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi christmas corols on paddington train station