मुंबईत मराठी भाषा भवनाला सात वर्षांत जागाच मिळाली नाही 

मुंबईत मराठी भाषा भवनाला सात वर्षांत जागाच मिळाली नाही 

मुंबई : मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी सात वर्षांत मुंबईत जागा मिळालेली नाही; परंतु नवी मुंबईने आघाडी घेत मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी जागा निश्‍चित करून वास्तू उभारण्यासाठी निविदाही मागवल्या.

मुंबईतील मुख्य केंद्राची जागा निश्‍चित करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष समितीची एकही बैठक न होता कालावधीही संपला. तथापि, अद्याप जागा निश्‍चित झालेली नाही. मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र बाजूला ठेवून राज्य सरकार उपकेंद्राच्या उभारणीसाठी पुढाकार घेत आहे. त्यासाठी नवी मुंबईतील एरोली येथे सेक्‍टर- १३ येथील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने निविदेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ३० जून २०१८ रोजी मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय जारी केला. या समितीत आमदार ॲड्‌. आशिष शेलार, बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, अभिनेते भरत जाधव, कवी-अभिनेते किशोर कदम, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिवांचा सहभाग होता. 

ही समिती भाषा भवनाच्या मुख्य केंद्राच्या उभारणीसाठी दक्षिण मुंबई आणि वांद्रे-कुर्ला संकुल या भागांतील सरकारच्या ताब्यातील रिक्त जागांची पाहणी करून योग्य जागेची शिफारस राज्य सरकारकडे करणार होती. समितीचा कार्यकाल तीन महिन्यांचा होता; मात्र नेमणूक झाल्यापासून समितीची एकही बैठक झाली नसल्याची माहिती ‘सकाळ’ला माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com