मेसेजिंगच्या जमान्यात शब्दसंपत्ती हरवत चालली आहे; जयपूर साहित्य महोत्सवात प्रसून जोशी यांची खंत

मेसेजिंगच्या जमान्यात शब्दसंपत्ती हरवत चालली आहे; जयपूर साहित्य महोत्सवात प्रसून जोशी यांची खंत

जयपूर  : कविश्रेष्ठ गुलजार यांच्या पिढीतल्या कवी, गीतकारांमध्ये असलेले शब्दभांडार आमच्या पिढीपर्यंत येता येता कमालीचे आकुंचन पावत आहे. एसएमएस आणि शॉर्ट मेसेजिंगच्या आजच्या जमान्यामध्ये शब्दकोश रिता होत चालला आहे. साहित्यीक प्रसून जोशी यांनी नुकतीच गुलजार साहेबांशी बोलताना ही खंत व्यक्त केली. जगातला सर्वात मोठा साहित्यिक जलसा असलेल्या 14 व्या जयपूर साहित्य महोत्सवात ते बोलत होते. 

19 फेब्रुवारीपासून जयपूर साहित्य महोत्सव हा पहिल्यांदाच आभासी पद्घतीने सुरू असून तो 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यात भाषिक साहित्य, संशोधन, नाटक, संगीत, कला, शेती,  आणि देशातील इतर महत्त्वाच्या  विषयांवर  3 हजार 500 अधिक विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.
 
आज झालेल्या एका कार्यक्रमात संगीतकार आणि विद्वान अशा विद्या शहा यांच्याशी गप्पा मारताना प्रसून जोशी यांनी समाज माध्यमांच्या प्रभावामुळे आजकाल गीतलेखनही कठीण होत असल्याची भावना बोलून दाखवली. 'आज माझे शब्दभांडार काहीसे तोकडे पडल्यासारखे वाटते. एकेकाळच्या गीतांमध्ये अनेकानेक उत्तमोत्तम शब्दांचा वापर होत असे. चित्रपटांची गाणी त्यांच्या गीतकारांमुळे ओळखता येत असत. हल्ली तसा प्रेक्षकवर्गही नाही आणि खेदकारक बाब म्हणजे तसे शब्दभांडार असणारे कविही विरळ झाले आहेत,' असे जोशी म्हणाले.

विद्या शाह यांनीही प्रसून जोशी यांच्या भावनांशी सहमती दर्शवली. 'संगीत ऐकत असताना तल्लिनता असल्यास ते संगीत तुम्हाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातं. पण असं अभिजात संगीत ऐकण्यासाठी देखील एकप्रकारची साधना लागते. ती नसल्यास या संगीताचा आस्वाद घेता येत नाही,' असे शाह म्हणाल्या. 

लोकसंगीत हेही कोणत्याही दुसऱ्या प्रकारच्या संगीताइतकंच श्रेष्ठ असल्याचे मत प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. लोकसंगीताला कोणत्याही एका प्रदेशाचे संगीत असे बांधून ठेवता येत नाही. लोकसंगीत हा आपल्या देशाच्या सांगितिक इतिहासाचा गाभा आहे, असेही जोशी व शाह यांच्या चर्चेतून ऐकायला मिळाले. उभयतांनी गप्पा मारताना काही रचनाही सादर केल्या.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi latest news age of messaging, vocabulary is losing ground prasoon joshi live update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com