आगरी समाजावर लिहिणार पुस्तक; प्राध्यापकाचा समाजाभिमुख निर्णय

Mla Raju Patil
Mla Raju Patilsakal media

डोंबिवली : मराठी साहित्याच्या (Marathi literature) अभ्यासक्रमात आगरी भाषेचा (Agari Language) आता समावेश झाला आहे. याकडे आगरी भाषिक तरुणासोबतच इतर भाषिक तरुणांचाही कल वाढला पाहिजे. या भाषेची समृद्धी (Agari Language prosperity) तसेच त्याची गपदी वाढविण्यासाठी आगरी भाषेवर पुस्तके (book on Agari Language) लिहिणार आहेत. तेव्हाच या भाषेचा प्रचार, प्रसार होऊन त्याची माहिती नागरिकांना होईल. या भाषेवर जास्त पुस्तके उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रा. सुरेश मढवी (Dr suresh Madhavi) यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच आगरी भाषा विषयात पीएचडी प्राप्त केली आहे.

डोंबिवली जवळील उंबार्ली गावात राहणारे प्रा. सुरेश मढवी हे गेल्या 13 वर्षांपासून कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विषय शिकवत आहेत. नांदेड येथील विद्यापीठातून 'ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास' या विषयात याचवर्षी त्यांनी पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. 2014 पासून ते आगरी भाषेचा अभ्यास करत आहेत.

याविषयी ते म्हणाले, आगरी समाजात शिक्षणाची सुरवात 1960 साला पासून झाली. त्यामुळे पूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नव्हते. दहा मैलावर बोलीभाषा बदलत असली तरी त्यांच्या रूढी परंपरा या सारख्या असतात. त्यामुळे माहिती गोळा करण्यासाठी सहा तालुक्‍यातील प्रत्येकी 55 गाव निवडली. आणि आसपास गावांमधून दहा घरे निवडून प्रश्नावली मार्फत माहिती गोळा केली. आगरी समाज हा मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर इतकंच नव्हे तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही वास्तव्याला आहे. मुंबई, ठाणे येथे आगरी, कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित आहे. या हेतूनेच या समाजाची ओळख इतर समाजास व्हावी म्हणून याचा अभ्यास केल्याचे मढवी यांनी सांगितले.

मढवी यांना पीएचडी प्राप्त झाल्याने, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे. त्यांचं उंबार्ली गावात जल्लोषात स2अंगात करण्यात आले. मनसे आमदार राजू पाटील यांचे ते वर्गमित्र असल्याने ते देखील मढवी यांच्या कौतुक सोहळ्याला उपस्थित होते. आमदार पाटील यांच्यासह सर्व वर्ग मित्रांनी मढवी यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com