आदिवासी बांधवांना शौचालयांसाठी १० लाखाचे अर्थसहाय्य

दिलीप पाटील
रविवार, 7 जानेवारी 2018

वाडा - अंगावर तोकडे कपडे, रानावनात भटकंती, आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ, डोंगराळ भागात राहणारे, मुख्य प्रवाहापासून दूर असणारे, इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव आता 'टॉयलेट'मध्ये जाणार आहेत. पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या (केएसडब्ल्यूए) सहकार्याने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे या आदिवासी गावात ५० अत्याधुनिक शौचालये बांधली आहेत. शौचालयाबरोबरच सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले गेले आहे. 

वाडा - अंगावर तोकडे कपडे, रानावनात भटकंती, आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ, डोंगराळ भागात राहणारे, मुख्य प्रवाहापासून दूर असणारे, इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव आता 'टॉयलेट'मध्ये जाणार आहेत. पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या (केएसडब्ल्यूए) सहकार्याने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे या आदिवासी गावात ५० अत्याधुनिक शौचालये बांधली आहेत. शौचालयाबरोबरच सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले गेले आहे. 

सोनाळे गावात एकूण १२३ घरे असून, त्यातील ५० घरांना पहिल्या टप्प्यात शौचालये बांधून देण्यात आली आहेत. हे काम ग्रामस्थांची रीतसर परवानगी घेऊन पूर्ण केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७३ ग्रामस्थांची परवानगी मिळाल्यानंतर शौचालये बांधली जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या संमतीने सोनाळे गावात सौर पथदिवे बसविले जाणार आहेत. तर चौथ्या टप्प्यात लोकांमध्ये आरोग्याविषयी जागृती कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. प्रत्येक शौचालयावर नामफलकासहित सौर दिवे लावण्यात आले आहेत. यासाठी प्रति शौचालय २४ हजार रुपये आणि सौर दिव्यासाठी ११५० रुपये असा एकूण २५ हजार १५० रुपये खर्च आला आहे. त्यातील दोन हजार रुपये (शौचालयाचे) तर ५० रुपये (सौर दिव्याचे) नागरिकांनी भरले आहेत. उर्वरित खर्च फाउंडेशनने उचलला आहे. 

या प्रकल्पाविषयी बोलताना रितू छाब्रिया म्हणाल्या, "सोनाळे या आदिवासी गावाला स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी फाउंडेशन काम करीत आहे. उघड्यावर शौचास जाण्यामुळे होणारे आजार आणि आरोग्यावरील घटक परिणाम गावकऱ्यांना सांगितले आहेत. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शौचालय बांधून हागणदारी मुक्त गाव करायचे आहे. भवतालचा परिसर स्वच्छ ठेवून आपले वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. मुली आणि महिलांना खासगी आणि सुरक्षित आयुष्याबाबत जागृत करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे."

सोनाळे गावात उभारलेली ही शौचालये पर्यावरणपूरक आहेत. ही शौचालये बैठ्या आकाराची असून शोषखड्डा केलेला आहे. जेणेकरून त्याचे विघटन व्यवस्थित होईल आणि योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाईल. पाच वर्षांनी त्याचे सेंद्रिय खत म्हणून वापर होऊ शकतो. त्याचबरोबर ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी तसेच प्रायव्हसी मिळेल, अशी रचना केली आहे.

समाजाप्रती आपणही काहीतरी देणे लागतो, ही भावना सोनाळे ग्रामस्थांमध्ये रुजविण्यासाठी २००० रुपये शौचालयासाठी आणि ५० रुपये सौर दिव्यासाठी वर्गणी घेण्यात आली आहे. नागरिकांच्या वर्गणीतून जमा झालेली सुमारे एक लाख दोन हजार पाचशे रुपये इतकी रक्कम सीमेवर लढताना शहीद सैनिकांच्या पत्नींसाठी काम करत असलेल्या केंद्र सरकारच्या समितीला देणगी देण्यात येणार आहे.

मुकुल माधव फाउंडेशन, पुणेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी याप्रसंगी, 'भारत हा झपाट्याने विकसित होत असलेला देश आहे. परंतु, आरोग्यविषयीच्या अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. त्याला शौचालयाचा अभाव कारणीभूत आहे. विशेषतः मुली आणि महिलांना त्याचा अधिक त्रास होतो. अपुऱ्या आरोग्याच्या सोयीमुळे अनेक आजार उद्भवतात. हीच बाब लक्षात घेऊन आदिवासी पाड्यांमध्ये शौचालय उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे,' असे मत व्यक्त केले. 

सोनाळे गावातील या प्रकल्पाचे उद्घाटन सोमवार, दि. ८ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता सोनाळे ग्रामपंचायत, वाडा तालुका, पालघर येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, विकास कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, विकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यासह प्रश्नासनातील उच्च अधिकारी आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संचालिका रितू छाब्रिया यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: marathi news aadivasi toilets ten lakhs finance help