Vidhan Sabha 2019 : अभिजीत बिचुकलेला निवडणूक आयोगाची नोटीस

Vidhan Sabha 2019 : अभिजीत बिचुकलेला निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई ता.10ः मोठा गाजावाजा करत आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

आचारसंहितेच्या काळात उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालण्यात येते. ते तपासण्यासाठी दैनिक खर्च नोंद वह्या करणे बंधनकारक असते. अशा परिस्थितीत अभिजित बिचुकलेने अशा खर्चाच्या नोंदी असलेल्या वह्या तपासणीस सादर केलेल्या नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत अभिजित बिचुकले याला नोटीस पाठवण्यात आली आहे. 

अभिजित सोबत वरळीतल्या दोन उमेदवारांनाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी ही माहिती दिलीये.  बिचुकले सोबत विश्राम तिडा पाडम आणि महेश पोपट खांडेकर या दोघांना नोटीस जारी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचकुले  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर निवडणूक लढवतायत. त्यामुळे त्यामुळे अभिजित बिचुकले यांच्या अडचणीत वाढ झालीये. 

WebTitle : Abhijeet Bichukale gets notice from election commission


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com