श्रीदेवी यांच्यावर आज अंत्यसंस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. श्रीदेवी यांचा मृतदेह उद्या सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्‍सच्या सेलेब्रेशन स्पोर्टस क्‍लब येथे अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. यानंतर दोन वाजता येथूनच त्यांची अंत्ययात्रा निघून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्यास दुबई प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. श्रीदेवी यांचा मृतदेह उद्या सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्‍सच्या सेलेब्रेशन स्पोर्टस क्‍लब येथे अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. यानंतर दोन वाजता येथूनच त्यांची अंत्ययात्रा निघून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी (ता. 27) रात्री उशिरा भारतात आणले. श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी (ता. 24) रात्री निधन झाले. सुरवातीला हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले असल्याचे बोलले जात होते. मात्र दुबईतील शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचे निधन अपघाती बुडून झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल आल्यानंतर दुबईतील पोलिसांनी श्रीदेवी यांच्या निधनावर संशय व्यक्त करीत बोनी कपूर यांची कसून चौकशी केली. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून श्रीदेवी यांचे फोन कॉलचा तपशीलही तपासला. अखेर आज तिसऱ्या दिवशी सर्व चौकशी पूर्ण होऊन संशयास्पद काहीही न आढळल्याने दुबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. 

अनिल कपूर यांच्या घरी रीघ 
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते अनिल कपूर यांच्या घरी कलाकारांची रीघ लागली आहे. अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, वहिदा रेहमान, मधुर भांडारकर व रमेश सिप्पी यांनी आज कपूर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Web Title: marathi news actress sridevi bollywood mumbai entertainment