नाट्य परिषद निवडणूक सोशल मीडियासह भेटीगाठींद्वारे 

नाट्य परिषद निवडणूक सोशल मीडियासह भेटीगाठींद्वारे 

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या निमित्ताने प्रचाराला वेग आला असून, पत्रकार परिषदा, गुप्त भेटीगाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध कलाकारांचा पाठिंबा घेत प्रचाराला वेग आला आहे. 

नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोहन जोशींच्या विचारांना पाठिंबा देणारे मोहन जोशी पॅनेल, प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनेल, राहुल भंडारेंचे अपक्षांचे पॅनेल; तर प्रदीप कबरेंच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले नटराज पॅनेल अशी रंगतदार झुंज यंदाच्या परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मोहन जोशी पॅनेलच्या वतीने पत्रकार परिषद, वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे; तर प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनेलने सोशल मीडियाद्वारे प्रचारात आघाडी घेतली आहे. आपलं पॅनेलच्या माध्यमातून सध्या "माझा रंगभूमीला पाठिंबा' या टॅगलाईनखाली प्रसिद्ध कलाकारांचे बाईट्‌स अपलोड करण्यात आले आहेत. आपलं पॅनेलच्या फेसबुक पेजवरून सिद्धार्थ जाधव, श्रेया बुगडे, संजय मोने, वैभव मांगले, ऋतुजा देशमुख, आशुतोष कुलकर्णी, मृणाल चेंबूरकर, प्राजक्ता देशमुख, भाऊ कदम, सागर कारंडे, चिन्मय उदगीरकर, सुयश टिळक, चिन्मय मांडलेकर अशा सेलेब्रिटीजचा पाठिंबा असलेले व्हिडीओ पेजवर अपलोड करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com