esakal | महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती}

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतकुमार पाटील यांची राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई :  भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतकुमार पाटील यांची राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के.पी. विश्वनाथ यांचा  कार्यकाळ नियत वयोमानानुसार 4 नोव्हेंबर 2020 पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.  

मुंबई, पालघर, रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.   कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ ए. के. सिंह व राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे सदर समितीचे सदस्य होते.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news Appointment Dr Prashant Kumar Patil Vice Chancellor Mahatma Phule Agricultural University latest live