तीन महिन्यांत सावलीचे पुनर्वसन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

बेलापूर - घणसोली येथील सेंट्रल पार्कमुळे बाधित होणाऱ्या सावली गावचे पुनर्वसन तीन महिन्यांत होईल. याबाबत पालिका आयुक्तांशी बोलणे झाले असून, त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली. महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी (ता. २१) आमदार नाईक यांच्यासोबत सेंट्रल पार्क आणि कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानाच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी पार्कचे उद्‌घाटन करण्यापूर्वी सावली गावाचे पुनर्वसन करा, अशी सूचना त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

सेंट्रल पार्कसाठी ४४ चौरस मीटरचा भूखंड असताना सिडकोने पालिकेकडे कमी आकाराचा भूखंड हस्तांतरित केला आहे. त्यामुळे उर्वरित जागेची मागणी करणार असून, ती मिळाल्यावर पार्किंग आणि इतर सुविधांसाठी तिचा वापर केला जाईल. 

पार्कमधील कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. काम सुरू असतानाच त्यातील त्रुटी दूर करा, असे निर्देश आमदार नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: marathi news belapur MLA sandeep naik