बेस्टमध्ये पुन्हा पांढरा हत्ती! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - बेस्ट उपक्रमाचा यंदाचा आर्थिक वर्षातील परिवहन विभागाचा तोटा 750 कोटींवर पोहचला आहे. आगामी काळात यात आणखी भर पडणार आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे बेस्टच्या ताफ्यात नव्या एसी बस दाखल होणार आहेत. 

मुंबई - बेस्ट उपक्रमाचा यंदाचा आर्थिक वर्षातील परिवहन विभागाचा तोटा 750 कोटींवर पोहचला आहे. आगामी काळात यात आणखी भर पडणार आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे बेस्टच्या ताफ्यात नव्या एसी बस दाखल होणार आहेत. 

बेस्ट उपक्रमाने याआधी 2006 मध्ये 280 बस खरेदी केल्या होत्या. मुंबईभर अनेक मार्गांवर सुरू झालेल्या एसी बस प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्याची वेळ बेस्टवर आली. या बस प्रवाशांसाठी सुरू करतानाच उपक्रमाचे नियोजन अपुरे पडले, असे मत बेस्ट समिती सदस्याने मांडले आहे. बेस्टच्या ताफ्यात 10 टक्के एसी बस असाव्यात, असे उपक्रमाचे धोरण होते; पण आठ वर्षे धावलेल्या एसी बसमुळे बेस्टला 700 कोटींचा तोटा झाला. या बस रस्त्यावर आणताना कोणतेही नियोजन झाले नाही. त्यामुळेच सगळा प्रयत्न फसला असे या सदस्याने सांगितले. मार्गिकेचे नियोजन आणि तिकीट दर निश्‍चित करून बस सुरू केल्या असत्या तर फायदा झाला असता, असेही ते म्हणाले. 

बेस्टच्या ताफ्यात नव्या 200 मिडी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी 20 एसी बस असतील. ओला, उबेरसारख्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी या बस सुरू करण्याचा उपक्रमाचा मानस आहे. अशा बस चालवण्यासाठी येणारा खर्च तिकिटांच्या माध्यमातून भरून निघत नाही. त्यामुळेच आधीच्या बसही अनेक मार्गांवर तोट्यातच धावल्या, असे समितीच्या एका सदस्याने सांगितले. 

एसी बसचा मार्ग... 
नव्या एसी बस मुंबई शहरात कफ परेडपासून आणि ठाणे, कुलाबा, दहिसर, मिरा रोड आदी भागांत धावतील. अनेक रेल्वे स्थानकांशी जोडलेल्या मार्गांवर या बस चालवण्याचा बेस्टचा मानस आहे. तसेच मोबाईल ऍपद्वारे या बसचे तिकीट बुक करता येणार आहे. 

Web Title: marathi news best bus mumbai