प्लॅस्टिक गोळा करून पर्यावरणाचे हित जपणारे भंडारी दांपत्य  

गजानन चव्हाण
सोमवार, 11 डिसेंबर 2017

खारघर : खारघर डोंगरावर प्रभात फेरीसाठी जाणारी काही  वृक्षप्रेमी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करीत आहे. तर निसर्गरम्य डोंगर प्लॅस्टिकयुक्त होवू नये म्हणून पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या गोळा करून निसर्गाची रक्षण करीत आहेत. खारघरच्या फणसवाडी व चाफेवाडी डोंगरात रोज लोक मोठ्या प्रमाणात प्रभातफेरीसाठी जातात. तर काही निसर्ग आस्वादच्या नावाखाली सुरक्षा रक्षकास खोटे सांगून डोंगरावर  दारू पिऊन प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल फेकून देतात. प्लॅस्टिकमधील वस्तू नष्ट होतील पण प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक प्राण्यांच्या पोटात अडकून राहते.

खारघर : खारघर डोंगरावर प्रभात फेरीसाठी जाणारी काही  वृक्षप्रेमी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करीत आहे. तर निसर्गरम्य डोंगर प्लॅस्टिकयुक्त होवू नये म्हणून पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या गोळा करून निसर्गाची रक्षण करीत आहेत. खारघरच्या फणसवाडी व चाफेवाडी डोंगरात रोज लोक मोठ्या प्रमाणात प्रभातफेरीसाठी जातात. तर काही निसर्ग आस्वादच्या नावाखाली सुरक्षा रक्षकास खोटे सांगून डोंगरावर  दारू पिऊन प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल फेकून देतात. प्लॅस्टिकमधील वस्तू नष्ट होतील पण प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक प्राण्यांच्या पोटात अडकून राहते. त्यामुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. तसेच जमिनीत असलेले प्लॅस्टिक नष्ट होत नाही. 

हे मानवी आरोग्यास घातक असल्याचे पाहून सीबीडी मध्ये राहणारे गजानन आणि अर्चना भंडारी हे दाम्पत्य खारघर डोंगरावर प्रभातफेरीसाठी जातात, आणि रोज वीस ते पंचवीस मिनिटे डोंगरात चकरा मारून तळीरामानी डोंगरावर पार्ट्या करून इतरत्र फेकलेले प्लॅस्टिक गोळा करून आपल्या वाहनातून खाली घेऊन येण्याचे काम करीत आहेत. गजानन भंडारी म्हणाले निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी कचरा व प्लॅस्टिकमुक्त असावी, आपल्यामुळे पर्यावरणालाही हानी पोचू नये, याची काळजी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. परंतु मद्यप्रेमी डोंगर देखील सोडत नाहीत.

सिडकोने डोंगराच्या पायथ्याला प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षाकांची नेमणूक केली आहे. परंतु तळीराम सुरक्षा रक्षकास डोंगरावर असलेल्या वाघोबा देवीच्या दर्शनाच्या नावाने डोंगरावर जाऊन पार्ट्या करून प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल, पत्रावळ्या तिथेच टाकून येतात. फेकून देण्यापेक्षा येताना प्लॅस्टिकचा कचरा पिशवीत खाली आणून कचरा पेटीत टाकणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक मानवी आरोग्यास हानीकारक आहे. या विषयी शासन, सामाजिक संस्था जनजागृतीचे काम करूनही नागरिकांच्या लक्षात येत नाही. या विषयी दुःख वाटते. गेल्या वर्षभरात भंडारी दांपत्याने डोंगरावर पडलेले प्लॅस्टिक गोळा केल्याचे सांगतात. खारघर पोलिसांनी महिन्यातून दोन वेळा मोहीम राबविल्यास तळीरामावर वचक बसेल. चार डिसेंबर पासून सिडकोने पहाटेच्यावेळी वाहनांना प्रवेश बंद केली आहे. त्यामुळे भंडारी दांपत्यामध्ये नाराजी पसरली आहे. 

 

Web Title: Marathi news bhandari couple collects plastic and contributing to environment