भारत संचार निगममुळे नोंदणी कार्यालयाच्या कामाचा बोजवारा

 अच्युत पाटील
मंगळवार, 20 मार्च 2018

बोर्डी - खंडित वीज पुरवठा आणि भारत संचार निगमच्या सुस्त कारभारामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची रखडपट्टी होत आहे. कासवगतिने चलणाऱ्या इंटरनेट सेवेने देशाचा विकास झपाट्याने कसा होईल असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. जमीन, घर खरेदी-विक्री व्यवहार, जन्म, मृत्यू, विवाह नोदणी करणे यासाठी कार्यालयात हेलपाटे मारत असतात. 

डहाणू येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार दिनांक 19 मार्च रोजी नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सकाळी साडेदहा वाजता कार्यालय सुरू झाल्यावर कामकाज सुरू झाले, परंतु संगणक सुरु करताच भारत संचार निगमचे सर्वर बंद असल्याने नोंदणीची कामे दुपारी दोन वाजता नंतर इंटरनेट सुरू झाल्यावर केली जातील असे सांगण्यात आले. दुपारी दोन वाजता इंटरनेट सेवा सुरू झाली परंतु सर्वर हळूहळू चालत असल्याने पडतळणीच्या कामात विलंब होत होता. त्यातच वीज पुरवठ्याचे काही खरे नव्हते दुपारी दोन ते सहा वाजता पर्यंत पाच वेळा पुरवठा बंद झाला. यामुळे कामकाज धिम्यागतीने चालले होते. सकाळी कार्यालय सुरू होताना सुमारे पन्नास लोकांनी नोंदणी करण्यासाठी रांग लावली होती त्यापैकी सायंकाळी सहा वाजता फक्त एका व्यवहाराची नोंदणी पुर्ण झाली. अशा प्रकारे कासवाच्या गतीने कामकाज चालल्यास देशाचा विकास कसा होणार असा प्रश्न नागरिकांना सतावित आहे.
  
भारत संचार निगमच्या कल्याण सर्कलच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. लाखो दुरध्वानी बंद पडले आहेत. सर्व शासकीय कामे आँनलाईन करावयाची आहेत. परंतु इंटरनेट सेवा नियमित नसल्याने नागरीकांची रखडपट्टी होते. इंटरनेट सेवा बंद पडल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानविषयाचा पेपर देता आला नव्हता

Web Title: marathi news bharat sanchar nigam