भिवंडीत कारखान्याला आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

भिवंडीत कोन गावात रस्त्यालगत राममंदिराशेजारी लाकूड साहित्य तयार करणाऱ्या कारखान्याला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. यात लाकडी सोफा, पाळणा आणि विविध प्रकारचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आग आटोक्‍यात आली. 

भिवंडी : भिवंडीत कोन गावात रस्त्यालगत राममंदिराशेजारी लाकूड साहित्य तयार करणाऱ्या कारखान्याला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. यात लाकडी सोफा, पाळणा आणि विविध प्रकारचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आग आटोक्‍यात आली. 

कोनगाव पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, भिवंडी-कल्याण मार्गावर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. भिवंडीत कोनगावात लाकडी सोफा, पाळणे इतर लाकडांचे साहित्य बनवण्याचा कारखाना आहे. त्यात रेक्‍झीन, फोम, लाकडाचे पाळणे, टेबल आदी वस्तूंसाठी लागणारे वॉर्निशसारखी रसायने आहेत. कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू होते. त्या वेळी पत्र्याच्या शेडने पेट घेतला. कारखान्यात आग प्रतिबंधक साहित्य नसल्याने आग पूर्ण कारखान्याला लागली. कामगार आणि परिसरातील घरातील नागरिकांनी येथून पळ काढला.

कल्याण-डोंबिवली महापालिका व भिवंडी महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी 6 वाजता ही आग आटोक्‍यात आणली. आग विझवत असताना येथील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. कोनगाव पोलिसांत या घटनेची नोंद केली आहे. 

Web Title: Marathi News Bhivandi Factory Fire