सीडीआर प्रकरणी नवाजउद्दीन सिद्दिकीला समन्स

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

ठाणे - नवाजउद्दीन आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कलह असल्याने त्यांनी पत्नीचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) घेतला असल्याची बाब चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा सीडीआर विक्री प्रकरणात अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकी यांना समन्स बजावण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींकडून त्यांनी सीडीआर विकत घेतले असून, चौकशीसाठी नवाजउद्दीन याना शुक्रवारी बोलविण्यात आले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. याबाबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. 

पोलिसांनी सीडीआर विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. यामध्ये खासगी गुप्तहेरासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये भारतातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित हिचाही समावेश आहे. नवाजउद्दीन सिद्दिकी यांना चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत गुन्हे शाखेने आठ दिवसांपूर्वीच समन्स पाठवले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

गुन्हे शाखेने नवाजउद्दीन यांचे वकिल रिजवान सिद्दिकी यांची यापूर्वी चौकशी केली आहे. परंतु, अनेकदा फोन करुनही नवाजुद्दीन मात्र चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. असे असले तरी दोन ते तीन दिवसांत ते चौकशीसाठी येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: marathi news bollywood actor nawazuddin siddiqui Call Data Record case