बहिणीचे अंत्यसंस्कार करुन दिला दहावीचा पेपर

अच्युत पाटील
बुधवार, 21 मार्च 2018

बोर्डी - अजय कलंगडा या विद्यार्थ्याची मोठी बहीण अंजली कलंगडा हिचे दि.20 मार्चला रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांचे छत्र नसलेल्या अजयची आई घरकाम करून कुटुंबाचे पालनपोषण करते. बहिणीच्या निधनानांतर तिच्यावर अंत्यसंकार करुन अजय आजच्या भूगोलाच्या पेपरला हजर राहिला होता. 

अजय डहाणू जवळील नरपड येथे अ.ज.म्हात्रे विद्यालयात शिक्षण घेत आहे. अजयच्या बहिणीच्या मृत्यूबाबत शाळेचा माजी विद्यार्थी केतन पाटील याने मुख्याध्यापिक सौ.सुजाता राऊत यांना कळवले. त्यानंतर मुख्याध्यापिकांनी तातडीने विषय शिक्षिका सौ.लता माळी यांना त्या विद्यार्थ्यांच्या घरी पाठविले. त्यानंतर आजच्या भूगोलाचा पेपरला जाण्यासाठी धीर देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे तसेच नातेवाईकांना अत्यसंस्कार लवकर करण्यास सांगितले. त्यामुळे अजयला पेपरच्या वेळेत परिक्षा केंद्रावर पोचणे शक्य झाले. 

सकाळी 10.30 वा बहिणीला अग्नी देऊन तसाच परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिला. मुख्याध्यापिकांनी स्वतः केंद्रावर हजर राहून अजयला धीर दिला. या कामी पोंदा शाळेचे परीक्षा केंद्रप्रमुख बागेसर व त्यांच्या सहकार्यानी मोलाची साथ दिली.

Web Title: marathi news bordi 10th exam paper