सीसीटीव्हीच्या कामाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका

अच्यूत पाटील
गुरुवार, 15 मार्च 2018

बोर्डी : बोर्डीत सीसीटीव्ही बसविण्यासाठी भूमिगत केबल टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामाचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला. खोदकाम करताना भारत संचार निगमची भूमिगत केबल तुटल्याने अखेरच्या क्षणी इंटरनेट नेटवर्क बंद झाल्याने माहिती तंत्रज्ञान विषयाचा ऑनलाईन पेपर संकेतस्थळावर पोचला नसल्याने पहिल्या गटातील चोविस विद्यार्थ्यांना आता सोमवारी पुन्हा परिक्षा पेपर द्यावा लागणार आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित फिरोजशा गोदरेज कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी (ता. 15) बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान विषयाचा पहिल्या गटातील चोविस विद्यार्थी ऑनलाईन परिक्षा पेपर देण्यासाठी हजर होते. साडेदहा वाजता नियमित परिक्षा सुरू झाली होती. विद्यर्थ्यांनी संपूर्ण पेपर सोडवुन पुर्ण केला होता. मात्र एक वाजून पंचेचाळीस वाजता भारत संचार निगमची इंटरनेट सेवा अचानक बंद पडली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी खोदकाम करताना भुमिगत केबल तुटल्याने इंटरनेटसेवा बंद झाल्याचे सांगितले. मात्र चोविस विद्यार्थ्यांना या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे.

Web Title: Marathi news bordi news cctv work 12th students loss