बोर्डी - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाईक रॅलीचे आयोजन

अच्यूत पाटील
शुक्रवार, 16 मार्च 2018

बोर्डी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या तरुण-तरुणींनी बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 7-45 वाजता सोमवंशी क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या बोर्डी येथील कै. गजिताई सावे स्मारक सभागृह येथे मंडळाच्या अध्यक्षा गीता व गणेश भास्कर राऊत यांच्या हस्ते गुढी उभारण्यात येईल.

ठिक 8-15 वाजता विजयस्तंभ भव्य बाईक रॅलीचा शुभारंभ होऊन घोलवड रेल्वे स्थानक मार्गाने घोलवड गावातील झेंडाचौक येथून 8-40 वाजता डॉ, जगन्नाथ मोहनलाल पाठक मार्गाने 9-15 वाजता बोरीगाव राधा कृष्ण मंदिर येथून पुन्हा परतीच्या मार्गाने 9-30 वाजता बोर्डी येथील विजरस्तंभ येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी वाहतुकीचे नियमानुसार हेल्मेट अवश्य घालावे.तासी तीस किलोमीटर पेक्षख जादा वेगाने बाईक चालवू नयेत अशा सुचना आयोजकानी दिल्या आहेत.

Web Title: Marathi news bordi news organised bike rally

टॅग्स