बुलडाणा: 60 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

तामगाव पोलिसांनी आज (शनिवार) पहाटे आरोपीला ताब्यात घेऊन कलम 354 नुसार कार्यवाही केली. या गावातील महादेव अस्वार नामक इसमाने गावातीलच 15 वर्षीय मतिमंद असलेल्या मूलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात विनयभंग केला.

संग्रामपुर (बुलडाणा) : तालुक्यातील एकलारा बानोदा येथील 60 वर्षीय वृद्धाकडून 15 वर्षीय मतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. तामगाव पोलिसांनी आज (शनिवार) पहाटे आरोपीला ताब्यात घेऊन कलम 354 नुसार कार्यवाही केली. या गावातील महादेव अस्वार नामक इसमाने गावातीलच 15 वर्षीय मतिमंद असलेल्या मूलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात विनयभंग केला.

या फिर्यादीवरुन तामगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपी ताब्यात घेतले आहे. या भागातील 10 दिवसातील ही दूसरी घटना ठरली आहे.

Web Title: Marathi news Buldhana news harassment