डोंबिवलीत सायकल संमेलानाला चांगला प्रतिसाद

संजीत वायंगणकर
रविवार, 28 जानेवारी 2018

डोंबिवली - डोंबिवलीत भरलेल्या पहिल्या सायकल संमेलनाचे उद्घाटन स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी सकाळी पार पडले. तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पहिलेच सायकल छायाचित्रे प्रदर्शन पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी केली.

डोंबिवलीत यंदा पहिल्यांदाच सायकल मित्र संमेलन होत आहे. क्रीडा भारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन आणि वाहतूक पोलिसांच्यावतीने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हे संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून सायकल प्रेमी सामील झाले आहेत. या संमेलनाच्या सुरवातीला जनजागृतीसाठी रविवारी (ता. 28) सकाळी डोंबिवलीत सायकल फेरी काढण्यात आली. ज्यात अनेक सायकलस्वार सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच या रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यात अनेक वेगवेगळ्या आणि अनोख्या सायकलीही डोंबिवलीकरांना पाहायला मिळाल्या. या सायकल फेरीत 80 वर्षाचे जेष्ठ सायकलस्वार गोविंद परांजपे हे सांगलीहून आले आहेत. तर 76 वर्षाचे श्यामसुंदर केसरकर आणि 90 वर्षांचे डी. व्ही. भाटे हे ठाण्याहून सहभागी झाले. 

Web Title: marathi news cycle rally dombivali mumbai