डहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन गेलेली नौका बुडाली

अच्युत पाटील
शनिवार, 13 जानेवारी 2018

डहाणू : डहाणू येथील के. एल. पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील सकाळच्या पहिल्या सत्रातील चाळीस विद्यार्थ्यांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली नौका बुडाली.

डहाणू : डहाणू येथील के. एल. पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील सकाळच्या पहिल्या सत्रातील चाळीस विद्यार्थ्यांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली नौका बुडाली.

ही घटना शनिवारा (ता. 13) दुपारी बाराच्या सुमारास घडली. शनिवार सकाळी लवकर कॉलेज सुटल्यावर मुले सफारीचा आनंद लुटण्यासाठी डहाणू खाडी येथून समुद्र सफारी करण्यासाठी गेली होती. किनऱ्यावरील मच्छीमारांना अचानक नौका दिसेनाशी झाल्याने तातडीने तपास सुरू झाला. तीस विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. तर पहिल्या तपासात दोन मृतदेह हाती आले असून आठ विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरु असून स्थानिक मच्छीमार, तटरक्षकदल हे पोलिसांना सहकार्य करत आहेत. डहाणू पारनाका येथील के. एल. पोंदा माध्यमिक विद्यालयासमोर व घटनास्थळी हजारोच्या संख्येने जमाव एकत्र झाला असून आक्रोश पसरला आहे.

 

Web Title: Marathi news dahanu news boat of 40 students falls