तुम्हाला दीपिकाचे कपडे आवडतात ? आता दीपिकाचे कपडे घ्या विकत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

आता दीपिका दर महिन्याला तिचे काही खास कपडे आणि ज्वेलरी ही तिच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर दीपिकाचे कपडे किंवा ज्वेलरी घायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता

दीपिका पदुकोण मला आवडत नाही असं म्हणणारे कदाचितच सापडतील. त्यात दीपिकाचा ड्रेसिंग सेन्स हा कायमच क्लासिक आणि एलीगंट राहिलाय. पण दीपिका सध्या चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या एका आगळ्या वेगळ्या मोहिमेमुळे. नुकतंच दीपिकाने तीचं क्लोसेट हे ऑनलाईन विक्रीसाठी ठेवलं होतं आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळालाय. फक्त 2  तासातच दीपिकाचे सगळे कपडे आणि इतर वस्तू विकल्या गेल्या. 

 

 

आता दीपिका दर महिन्याला तिचे काही खास कपडे आणि ज्वेलरी ही तिच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर दीपिकाचे कपडे किंवा ज्वेलरी घायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. 

 

 

यातून आलेले पैसे दीपिका मानसिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी वापरणार आहे. 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ला मदत करण्यासाठी दीपिकाने हा नवा नवा उपक्रम राबवला आहे. खास  #WorldMentalHealthDay साठी दीपिका हि मोहीम राबवतेय. 

 

WebTitle : marathi news deepika padukons campaign for world mental health day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news deepika padukons campaign for world mental health day