मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई : मंत्रालयात काही निमित्ताने आलेल्या एका तरुणाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यात हर्षल रावते याचा मृत्यू झाला. 

हर्षल सुरेश रावते याला मेहुणीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो गेले महिनाभर पॅरॉलवर तुरुंगाबाहेर होता. आज त्याच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता. त्याने हे कृत्य का केले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. गेल्या काही दिवसांत मंत्रालयात आत्महत्या करण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. 

याआधी धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मारुती धावरे या 28 वर्षांच्या तरुण शेतकऱ्यानेही कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ही घटना टाळण्यात पोलिसांना यश आले होते. 

हर्षल रावते याने मेहुणीची 80 हजार रुपयांची फसवणूक करून ती फसवणूक उघडकीस येऊ नये म्हणून हत्या केली होती, अशी माहिती मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, विजय शिवतारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Web Title: marathi news Dharma Patil suicide Mumbai Mantralay